dr.satish best web design developer for mac

खणदाळ ग्रामपंचायत :

हिरण्यकेशी नदीच्या पायथ्याशी वसलेले आमचं गाव म्हणजे मौजे खणदाळ. हे गडहिंग्लज तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. गावाच्या शेजारी नांगनुर, नूल, बसर्गे, हिटणी ही गावे आहेत. या गावात श्री. महालक्ष्मी देवीचे भव्य असे मंदिर आहे. या व्यतिरिक्त शंकरलिंग, हनुमान, बसवेश्वर, बेलपत्री बसवेश्वर, रेणुका, थलोबा, दत्तात्रय हे इतके मंदिर आहेत. तसेच या गावची महालक्ष्मी यात्रा म्हणजे असपासमध्ये सर्वात मोठी यात्रा असते. या देवीची यात्रा ५ वर्षातून एकदा होते. गावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात शुद्धिकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. ग‌ट‌र्स, रस्ते, ग्राम‌स‌चिवाल‌य‌ बांध‌काम‌, रिकाम्या जागेव‌र ब‌गीच्या क‌रणे, विंध‌न‌ विहिरी, सांड‌पाणी प्रक‌ल्प‌, क्रीडा संकूल‌, वृ्क्ष‌ लाग‌व‌ड‌, सौर दिवे, क‌च‌रा-कुंड्या, सार्व‌ज‌निक‌ कार्याल‌य‌, गाव‌ त‌लाव‌ बांध‌काम‌ क‌रणे इत्यादी सुविधा होणे आव‌श्य‌क‌ आहे.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 2 जुलै 1957 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर दहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. गाव‌च गावठाण क्षेत्र 7.79 हेक्ट‌र इतक आहे. त्याम‌ध्ये ऑस्ट्रेलिय‌न‌ बाब‌ळ‌ या रोपांची लाग‌व‌ड‌ करून वनीकरण केली आहे. गावातील‌ प्रत्येक‌ कुटुंबाने आप‌-आप‌ल्या घ‌रच्या प‌रिस‌राम‌ध्ये सांड‌पाण्याचा पूर्ण‌ वाप‌र क‌रुन‌ फ‌ळ‌बागा व‌ फुल‌बागा फुल‌विल्या आहेत‌.

सरपंच
सौ. सुशिला महेश मगदूम

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. राजेंद्र शंकर जाधव

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
सौ. गोरख बंडू डहाळे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Khandal Grampanchayat
A/p - Khandal Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone :

Office : 02327 – 233680